Friday, May 20, 2022
No menu items!
Homeआरोग्य & फिटनेसआष्टी तालुक्यातील शिरापूर येथे ४०० कोंबड्यांच्या मृत्यूने खळबळ

आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे ४०० कोंबड्यांच्या मृत्यूने खळबळ


आष्टी (रिपोर्टर):- जगभरासह देशामध्ये सध्या कोरोना महामारीचे संकट सुरु असताना, आता बर्ड फ्लूने देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. पाटोदा तालुक्यातील मुगगांव येथे ११ कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यानंतर दि.१२ रोजी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथील २ कावळ्यांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. तालुक्यातील शिरापूर येथे ही ३५० ते ४०० कोंबड्या मृत्यू पावल्याने पशुसंवर्धन विकास अधिकारी,मंडळ अधिकारी यांची टिम घटनास्थळी दाखल झाली असून मृत कोंबड्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल


आष्टी तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या गावामध्ये बर्ड फ्लू ने शिरकाव केला असून पाटोदा तालुक्यातील मुगगांव येथे ११ कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू नेच झाला आहे.हे स्पष्ट झाले असून आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथे ही २ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.तर शिरापूर येथील शेतकर्‍यांच्या ३५० ते ४०० कोंबड्या मरण पावल्या आहेत.दि.९ रोजी शिरापूर येथील किरण तागड यांच्या २० ते २५ कोंबड्या अचानक मेल्या.त्यांनी ह्या कोंबड्या नदीला फेकून दिल्या.तागड यांच्या प्रमाणे शिरापूर येथील चव्हाण बंधूंच्या कोंबड्या अचानक मेल्या.एका भावाच्या ३० ते ३५ आणि दुसर्‍या भावाच्या ५० ते ६० कोंबड्या रोगाने मरण पावल्या. त्यांनी या कोंबड्या पोत्यात भरून नदीच्या कडेला फेकल्या अशा अजून काही शेतकर्‍यांच्या मिळून ३५० ते ४०० कोंबड्या मरण पावल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी मंगेश ढेरे यांनी सांगितली या शेतकर्‍यांना या बर्ड फ्लू बद्दल माहिती नसल्याने त्यांनी मृत कोंबड्यांची परस्पर विल्हेवाट लावली असून घटनास्थळी पशुधन विकास अधिकारी,मंडळ अधिकारी सहाय्यक आयुक्त,पशुधन विस्तार अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा केला असून सॅम्पल तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवले आहेत.

अहवालाची प्रतिक्षा
शिरापूर गावातील शेतक-यांनी ३५० ते ४०० कोंबड्या मेल्याचे सांगितले असून आम्हाला घटनास्थळी फक्त एक कोंबडी आढळून आली आहे.शेतक-यांनी विल्हेवाट लावली असून या एका मृत कोंबडीचे सँम्पल्स पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. तसेच, अहवाल आल्यावरच पुढील खुलासा होईल आणि नेमके कारण समोर येईल,पक्षी मृत झाल्यास नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात तात्काळ संपर्क करावा
मंगेश ढेरे (पशुधन विकास अधिकारी,आष्टी)

Most Popular

error: Content is protected !!