Friday, May 20, 2022
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यासाठी १७ हजार कोव्हिड लसीची आरोग्य विभागाकडून मागणी

जिल्ह्यासाठी १७ हजार कोव्हिड लसीची आरोग्य विभागाकडून मागणी

७५ ठिकाणी शितग्रह,९ ठिकाणी होणार लसीकरण
बीड | रिपोर्टर
मोठ्या प्रतिक्षेत असलेल्या कोव्हिड लसीची मात्रा देण्यास सरकारने मंजूरी दिल्यानंतर बीड जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यासाठी १७ हजार कोव्हिड लसीची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने सरकारकडे नोंदवलेली आहे. बीड जिल्ह्यासाठी कोव्हिड लस अद्यापपर्यंत बीड येथे पोहचलेली नसून ती कोव्हिड लस संध्याकाळपर्यंत बीड येथे उपलब्ध होईल. औरंगाबाद विभागासाठी देण्यात येणार्‍या कोव्हिड लसीचे आगमन औरंगाबाद या ठिकाणी झाले आहे. त्यामुळे १७ हजार कोव्हिड लसीची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात किती लस येतात याच्यावरच पुढचे नियोजन स्पष्ट होईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.


पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून या कोव्हिड लसीचे लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यासोबतच ज्यांना प्राधान्याने लस देणे आवश्यक आहे अशा सर्वांचे नियोजन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले असून बीड शहरासह जिल्ह्यात आलेल्या लसीचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी ७५ ठिकाणी शितग्रह उभा केलेले आहे. ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी प्रशिक्षित आरोग्य कर्मचार्‍याकडून हे लसीकरण करण्यात येणार आहे. वडवणी आणि शिरूर वगळता जिल्ह्यासह आठ ठिकाणी हे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक बुथवर आरोग्य विभागातील प्रशिक्षित पाच कर्मचार्‍यासह इतर कर्मचार्‍याचा स्टाफ तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्पयात ९ ठिकाणी ४५ प्रशिक्षित कर्मचार्‍याकडून हे लसीकरण करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये आरोग्य अधिकार्‍यासह १५ हजार अत्यावश्यक स्टाफ आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत बीड जिल्ह्याला किती लसीचा साठा प्राप्त होतो याच्यावरच या लसीकरणाचे पुढील नियोजन स्पष्ट होईल.


महाराष्ट्राला लसीचे कमी डोस मिळाले-आरोग्यमंत्री
पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलाय. केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही ५११ वरुन ३५० पर्यंत कमी करण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लस दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, १६ जानेवारी रोजी सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन करतील. महाराष्ट्रातील दोन रुग्णालयं एक कूपर रुग्णालय आणि दुसरं जालन्यातील जिल्हा रुग्णालय पंतप्रधानांशी यावेळी थेट संवाद साधू शकणार आहेत. अशा प्रकारे १६ जानेवारीला देशासह राज्यात लसीकरणाचं उद्घाटन केलं जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!