Friday, May 20, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईकोणीही आरोप केला म्हणून राजीनामा घेणार नाही-जयंत पाटील

कोणीही आरोप केला म्हणून राजीनामा घेणार नाही-जयंत पाटील

कौटुंबीक प्रकरणाचं कोणीही राजकारण करू नये-संजय राऊत

मुंबई (रिपोर्टर):- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांच्यावर कथीत आरोप झाले आहेत. त्यामुळे विरोधक राजीनाम्याची मागणी करत आहेत. परंतू कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही असं स्पष्ट मत जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर कौटुंबीक प्रकरणाचं कोणीही राजकारण करू नये असे शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप झाल्यानंतर आणि नवाब मलीक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केल्यानंतर विरोधकांनी या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य करतांना म्हटले, पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आवश्यकता भासली तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. तथ्याच्या आधारे योग्य भूमिका घेवू राजीनामा कोणीतरी आरोप केला म्हणून देणं ही बाब होणार नाही. पण या बाबतीत आम्ही पक्ष स्तरावर योग्य ती चर्चा करणार आहोत. धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी जर कोणी ब्लॅकमेल करत असेल, त्यांचा काही दोष नसेल तर राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. संबंधित यंत्रणा जिथे त्यांनी तक्रार केली आहे त्यांच्याकडून सगळी माहिती घेतल्यानंतर त्या यंत्रणा भूमिका घेतील, त्यानंतर आम्ही विचार करु असे त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे शिवसेनेचे खा.संजय राऊत म्हणाले की, हा पूर्णपणे त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे. काय निर्णय घ्यावेत आणि काही नाही याचा सर्वात जास्त अनुभव कोणाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं वाटत असेल तर तो भ्रम आहे, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांना लगावला. राजकीय विषयात आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही. पण कौटुंबिक विषयात कोणीही राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. राजकारणात एका उंचीवर, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावे लागतात. एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसात करु नये हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवल आहे. शरद पवारांनी सांगितलं आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं. सहकार्‍यांना माहिती देवून निर्णय-खा.शरद पवार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काल माझी भेट घेवून सदरच्या कथित प्रकरणाची संपूर्ण माहिती आपणास दिली आहे. याबाबत आपण पक्षातील सहकार्‍यांसोबत चर्चा करणार आहोत. सदरची संपूर्ण माहिती सहकार्‍यांना सांगणार आहोत. आरोपाचं स्वरूप गंभीर आहे, पक्षाच्या सहकार्‍यांसोबत बोलल्यानंतर या प्रकरणी तातडीने निर्णय घेवू.  कमिटीवर शरद पवारांचे प्रश्‍न चिन्ह गेल्या 54-55 दिवसापासून कडाक्याच्या थंडीत लाखो शेतकरी दिल्लीच्या सिमेवर बसून आहेत. कृषी कायदे रद्द करणेबाबत त्यांची मागणी आहे. केंद्र सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले नाही. याबाबत सुप्रिम कोर्टाने केंद्र सरकार विषयी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर या कायद्याला स्थगिती दिली आहे. परंतू सुप्रिम कोर्टाने जी कमिटी या बाबत स्थापन केली आहे ती संपूर्ण कमिटी सदरील कायद्याच्या बाजुची असल्याचे दिसून येते. त्यामुळेच शेतकरी अद्यापही आपल्या आंदोलनावर ठाम आहे. आपणही शेतकर्‍यांच्या बाजूने ठाम असून कमिटी ही सर्वसमावेशक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची असावी.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!