बीड (रिपोर्टर): राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कथीत आरोप झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. विरोधकांनी सदरचं प्रकरण ऐरणीवर धरत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र अशा स्थितीतही गेल्या दोन दिवसांपासून धनंजय मुंडे यांनी आपला संयम सोडला नाही. त्याचबरोबर लोकांचे काम करण्याची पद्धतही बदलली नाही. कालपासून धनंजय मुंडे आपले दैनंदिन काम करताना दिसून आले. आज मुंबईत जनता दरबार भरून मुंडेंनी कर्तव्यकर्माला महत्त्व देत काम चालू ठेवल्याचे दिसून येते. गेल्या दोन दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्याविरोधात विरोधकांकडून आक्रमकपणे आरोप होत राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
एका महिलेच्या कथीत आरोपाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. सदरच्या महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परवा कथीत आरोप केला. त्यापाठोपाठ धनंजय मुंडे यांनी आरोप होताच सोशलमिडियाद्वारे पोस्ट टाकून वस्तूस्थिती सांगून टाकली. त्यामुळे या प्रकरणाला अधिक हवा मिळाली आणि विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या सत्य कथनावर आक्षेप घेत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे राज्यभरातून समर्थक धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या सर्व परिस्थितीत अस्वस्थ वातावरणात धनंजय मुंडे डगमगले नाहीत किंवा आपला संयम सोडला नाही. गेल्या दोन दिवसांपासून धनंजय मुंडे आपले दैनंददिन राजकीय काम करताना दिसून येत आहेत. आज एकीकडून विरोधकांचे आरोपाचे हल्ले होत असतांना इलेक्ट्रॉनिक मिडियाकडून कथीत आरोपाच्या बातम्या चालवल्या जात असतांना या प्रकरणी पक्ष बैठक घेत असतांना धनंजय मुंडे मात्र आपल्या दैनंदिन कामाचा भाग असलेला जनता दरबार घेताना दिसून आले.पत्रकारांनी त्यांच्यावर होत असलेल्या कथीत आरोपाबद्दल विचारल्यानंतर धनंजय मुंडेंनी पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे उत्तर दिले. आज दिवसभर ते लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये मशगूल दिसून आले.