Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडअवंतिकाबाई नरवडे यांचे निधन

अवंतिकाबाई नरवडे यांचे निधन


पिंपळनेर (रिपोर्टर)- ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक किसनराव नरवडे यांचे दीड महिन्यापूर्वी निधन झाल्यानंतर काल त्यांच्या धर्मपत्नी अवंतिकाबाई किसनराव नरवडे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर काल पिंपळनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पिंपळनेरचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किसनराव नरवडे यांनी गेल्या दीड महिन्यापुर्वी १०३ व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. त्यापाठोपाठ काल त्यांच्या धर्मपत्नी अवंतिकाबाई किसनराव नरवडे यांचे वृद्धापकाळाने सकाळी ७.३५ वाजता निधन झाले. अवघ्या दीड महिन्यात नरवडे परिवारावर दोनदा दु:खाचा डोंगर कोसळला. ९२ वर्षीय अवंतिकाबाई यांच्या पार्थिवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्‍चात तीन मुले, मुली, नातवंडे, असा परिवार आहे. नरवडे कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!