Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडउद्या नाट्यगृहात स्व. जाहेर पाटील, स्व. दिलीप मंत्री यांच्यासाठी अभिवादन सभा

उद्या नाट्यगृहात स्व. जाहेर पाटील, स्व. दिलीप मंत्री यांच्यासाठी अभिवादन सभा


बीड (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यात उद्योगाचे बालकडू पाजणारे औद्योगीक , सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणीक व्यापार्‍यांसह अनेक क्षेत्रात कार्यकतृत्व करणारे कतृत्ववान स्व.इंजिनिअर अर्जुनराव जाहेर पाटील आणि स्व.दिलीप मंत्री यांच्यासाठी उद्या सकळ मराठा प्रतिष्ठाण बीडच्यावतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्व.इंजिनिअर अर्जनराव जाहेर पाटील व स्व.दिलीप सेठ मंत्री यांच्या गेल्या काही दिवसापासून निधन झाले. हे दोघेही उद्योग क्षेत्रात नाव कमवणारे व्यक्तीमत्व होते. अर्जुनराव जाहेर पाटील यांनी तर गेल्या ५० वर्षात बीड जिल्ह्यात नवउद्योग करणार्‍या तरुणांना उद्योगातून बालकडू पाजलं. लाखोचे आधारवड बनले. छत्रपती बँकेच्या माध्यमातून अनेकांना उद्योजक बनवले. अशा औद्योगीक, सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणीक, व्यापार, सहकार अशा विविध क्षेत्रात काम करणार्‍या या विभूतींना अभिवादन देण्यासाठी उद्या सकाळी दहा वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेसाठी माजी कुलगुरू सर्जेराव निमशे, प्रा.डॉ.श्रीमंत कोकाटे यांची उपस्थिती राहणार आहे. सदरच्या अभिवादन सभेचे आयोजन सकळ मराठा प्रतिष्ठाण बीड व जालना रोड व्यापारी संघटना बीड यांच्यावतीने करण्यात आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!