Friday, May 20, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईरेणू शर्माच्या अडचणी वाढणार? धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची पोलिसात तक्रार

रेणू शर्माच्या अडचणी वाढणार? धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची पोलिसात तक्रार


मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणार्‍या महिलेच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणार्‍या महिलेच्या विरोधात आता भाजप आणि मनसे पदाधिकारी यांच्यासह मुंडे यांच्या नातेवाईकांनी ही तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनीही तक्रार दाखल केली आहे. २०१९ पासून आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं केंद्रे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
ब्लॅकमेल करणे, त्रास देणे अशा प्रकारचा त्रास रेणू शर्मा यांच्याकडून दिला जात होता, असं केंद्रे यांनी अपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पुरुषोत्तम केंद्रे यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात तक्रार नोव्हेंबरमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
धनंजय मुंडे हे कथित आरोपांमुळे अडचणीत सापडले असताना पक्षाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं समजतंय. रात्री उशिरा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांची बोलविण्यात आली होती. ही बैठक तीन तास चालली. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अनिल देशमुख, जयंत पाटील, पलीि;जितेंद्र आव्हाड उपस्थित होते . ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ही बैठक झाली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!