Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यात १११ ग्रा.पं.साठी मतदान सुरू, काही ठिकाणी धूसफूस

जिल्ह्यात १११ ग्रा.पं.साठी मतदान सुरू, काही ठिकाणी धूसफूस


कडेकोट बंदोबस्त, दुपापर्यंत ४२ टक्के मतदान, जहॉंगीरमोहात ईव्हीएम बंद पडली
बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषीत झाल्यानंतर १८ ग्रामपंचायतींच्या १९३ जागा बिनविरोध काढण्यात आल्या. त्यातील १११ ग्रामपंचायतींच्या ८४२ जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी कार्यकर्त्यात धुसफूस पहावयास मिळाली मात्र कडेकोट पोलिस बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रिया सर्वत्र सुरळीत सुरू असून जहॉंगीरमोहा येथे ईव्हीएम बंद पडल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

16

आज दुपारी १ वाजेपर्यंत अंदाजे जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायतींसाठी ४२ टक्के मतदान झाले होते. ग्रामपंचायत आपल्यच ताब्यात यावी यासाठी गाव पुढार्‍यांनी गेल्या पंधरवाड्यात चांगलाच जोर लावल्याचे दिसू नयेते. आज सायंकाळी सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.


गेल्या काही दिवसांपुर्वी राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुका घोषीत करण्यात आल्या होत्या. यामध्ये बीड जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या १९३ जागा बिनविरोध निघाल्या. उर्वरित १११ ग्रामपंचायतींच्या ८४२ जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. गेल्या १५ दिवसांपासून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रचाराचा धुमाकूळ सुरू होता. गावपुढार्‍यांनी ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले असल्याचे दिसून आले.

काही गावाात दोन पॅनल तर काही गावांमध्ये तीन व चार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. अनेक गावातील पुढार्‍यांनी ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न केलेेले आहेत. त्यात बीड जिल्ह्यातील तलवाडा, गढी, रायमोहा, पारगाव घुमरा, निरगुडी यासह आदी मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुकीच्या दरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. दुपारी १ वाजेपर्यंत अंदाजे ४२ टक्के मतदान झालेले होते.

धारूर तालुक्यातील जहॉंगीर मोहा येथील मतदानावर मतदान यंत्र बंद पडल्याने तेथील कार्यकर्त्यांनी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र सदरील कार्यकर्त्यांना पोलिसांनी समज दिली. याबाबत मशीन बंद पडल्याची माहिती कर्मचार्‍यांनी तहसीलदारांना दिल्यानंतर त्यांनी दुसरी मशीन उपलब्ध करून दिली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!