Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडविशेष पोलिस महानिरीक्षक येणार म्हणून कार्यालय चकाचक

विशेष पोलिस महानिरीक्षक येणार म्हणून कार्यालय चकाचक


बीड (रिपोर्टर)- जिल्हा पोलिस दलाची विशेष पोलिस महा-निरीक्षकांकडून वार्षिक तपासणी होत आहे. ही तपासणी 11 जानेवारी ते 23 जानेवारी या काळात होत आहे. दरम्यान एसपी ऑफीसमधील सर्व विभाग चकाचक करण्यात आले असून येथील कामकाज मात्र रेंगाळले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चारित्र्य प्रमाणपत्र अनेकांना मिळाले नाहीत. याबरोबरच गंभीर गुन्ह्याचा तपास आणि इतर महत्वाचे कामही रेंगाळलेले दिसून येतात.
विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जून प्रसन्न हे 20 ते 23 जानेवारी रोजी बीडमध्ये जिल्हा पोलिस दलाची तपासणी करण्यासाठी येणार आहेत. तर 11 जानेवारीपासूनच तपासणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्यापुर्वी येथील कार्यालय चकाचक करण्यात आले आहेत. मात्र कामकाज रेंगाळलेले दिसून येते.

Most Popular

error: Content is protected !!