Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडराक्षसभुवन नदी पात्रातून वाळुचा उपसा महसूल विभागाला गांभीर्य नाही

राक्षसभुवन नदी पात्रातून वाळुचा उपसा महसूल विभागाला गांभीर्य नाही


बीड/कुक्कडगाव (रिपोर्टर)- सिंदफणा नदीच्या पात्रातून वाळुचा उपसा सुरुच आहे. या वाळु उपश्याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. वाळु माफियांनी राक्षसभुवन शिवारातील नदी पात्रातून उपश्याला सुरुवात केली, अनेक ठिकाणी वाळुचा साठा करण्यात आला. वाळु उपसणार्‍यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जाऊ लागली आहे.
कुक्कडगाव, चव्हाणवाडी, खुंड्रस यासह आदी परिसरातून यापुर्वी वाळुचा सर्रासपणे उपसा केला जात होता आणि आजही होत आहे. या वाळु उपश्याकडे महसूल प्रशासनासह पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. माफिया रात्रीच्या दरम्यान जेसीबी लावून वाळुचा उपसा करून चढ्या भावाने वाळू विकतात. गेल्या काही दिवसांपासून राक्षसभुवन शिवारातील नदी पातिून वाळू उपश्याला सुरुवात झाली. जेसीबीद्वारे वाळू उपसून अनेक ठिकाणी त्याचा साठा करण्यात आला. सदरील वाळू साठ्यावर छापे मारून वाळू उपसणार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!