Friday, May 20, 2022
No menu items!
Homeराजकारणगावगाड्यांचा मुखिया कोण? सोमवारी लागणार 111 ग्रा.पं.चा निकाल

गावगाड्यांचा मुखिया कोण? सोमवारी लागणार 111 ग्रा.पं.चा निकाल


बीड (रिपोर्टर)- देशाचे राजकारण एकीकड आणि गावचे राजकारण एकीकड. ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात असावी या हेतुने कुठे ग्रामपंचायतीची बोली लावली जाते तर कुठे साम-दाम-दंडातून ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात आणली जाते. बीड जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाल्यानंतर आता प्रत्येकाला निकालाची प्रतीक्षा असून सोमवार 18 जानेवारी रोजी या 111 गावगाड्यांचा मुखिया कोण? हे मतमोजणीच्या निकालानंतर दिसून येणार आहे. या 111 ग्रामपंचायतींमध्ये जिल्ह्यातल्या काही मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ज्या ग्रामपंचायती स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा निवडणुकीत प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे या निकालांकडेही जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 129 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. यामध्ये 18 ग्रामपं चायतींमधील 193 जागा बिनविरोध काढण्यात आल्या. जिल्ह्यातल्या या 18 ग्रामपंचायतींकडे आणि त्या त्या गावांकडे विकासाच्या दृष्टीकोनास प्रथम प्राधान्य दिल्याचे दिसून येते. दुसरीकडे देशाचं राजकारण एकीकडे आणि गावचं राजकारण एकीकडे असतो त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्ष-संघटना बाजुला ठेवून गावातले गट-तट ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींसाठी काल मोठ्या पोलिस बंदोबस्तात मतदान झाले. या 111 ग्रामपंचायतींमध्ये तलवाडा, गढी, रायमोह, पारगाव घुमरा, निरगुडी यासह अन्य काही मोठ्या गावांतही निवडणुका पार पडल्या. आता निकालाची प्रतीक्षा असून गाव पातळीवर ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात यावी, यासाठी प्रयत्नशील असलेल्यांना निकालाची उत्सुकता लागून आहे. 18 जानेवारी सोमवार रोजी निवडणुकीचा निकाल लागणार असून मोठ्या गावांवर कोणाचं वर्चस्व प्रस्थापित होतं याकडेही आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Most Popular

error: Content is protected !!