Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडचहाचे पैसे मागितले म्हणून हॉटेल चालकाला मारहाण

चहाचे पैसे मागितले म्हणून हॉटेल चालकाला मारहाण


बीड (रिपोर्टर):- चहा पिल्यानंतर त्याचे पैसे हॉटेल चालकाने मागितले म्हणून हॉटेल चालकाला काठीने, वीटाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना काल डोंगरकिन्ही फाटा येथे घडली असून या प्रकरणी हॉटेल चालक किसन येडूबा शिंदे वय ३९ रा.डोंगरकिन्ही यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे यांनी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अजित आश्रुबा वनवे रा.रोहतवाडी, रामहरी आणि इतर अनोळखी दोन इसम काल त्यांच्या हॉटेल सव्वा तीन वाजता चहा पिण्यासाठी आले होते. चहा पिल्यानंतर त्यांना चहाचे पैसे मागितले म्हणून त्यांनी काठीने आणि विटाने मारहाण करून गंभीर जखमी केले. व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून वरील आरोपीवर पाटोदा पोलीस ठाण्यात कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तापस पोलीस हवालदार भोसले हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!