Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडग्रामपंचायतींमध्ये विजयी मिरवणुकांवर बंदी

ग्रामपंचायतींमध्ये विजयी मिरवणुकांवर बंदी


फटाके वाजवू नये, गुलाल उधळू नका, जिल्हा प्रशासनाचे आदेश
बीड (रिपोर्टर)-जिल्ह्यात मतदान झालेल्या १११ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला उद्या सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास सर्व ग्रामपंचायतींचे निकाल हाती येतील. मात्र या ग्रामपंचायतींमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांनी कोणत्याही घोषणा द्यायच्या नाहीत आणि त्या सोबत गुलालही उधळायचा नाही, असे आदेश काल सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत.


ग्रामपंचायतमधील विजयी झालेले उमेदवार आणि त्यांचे गट आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे विजयी झाले की, मोठमोठ्या घोषणा देतात, गटा-तटाचे लोकं मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. आनंद साजरा करण्यासाठी फटाके वाजवून गुलाल उधळतात मात्र ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी अणि त्यांच्या समर्थकांनी कोरोना महामारीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यासही बंदी घातलेली आहे. सोबतच कोणाच्या भावना दुखू नये म्हणून घोषणाबाजीही करायची आणि वाद्य वाजवू नये असे आदेश काल जिल्हा प्रशासनाने संबंधितांना दिले आहेत. यासाठी आवश्यक ती खबरदारी तहसीलदार आणि पोलिसांनी घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे. या आदेशाची पायमल्ली करणार्‍यांवर नियमानुसार कारवाई करण्याचेही बजावण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!