रिपोर्टरचे प्रतिनिधी अनंत जाधव यांना बीट अंमलदार यांच्याकडून अरेरावी
मस्साजोग (रिपोर्टर) केज ते मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या मस्साजोग जवळ पुण्यावरून नांदेड कडे जात असलेल्या ओम साई राम ट्रॅव्हल्सचा पुलावरून कोसळुन अपघात झाल्याची घटना दिनांक 31 ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या रिपोर्टरच्या प्रतिनिधीची बिट अंमलदार यांनी अरेरावी केली असून याप्रकरणी बीट अंमलदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की पुण्याहून नांदेडकडे जाणारी ओम साई राम ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच 30 एन 3661 या ट्रॅव्हल्सचा बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास केज ते मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या मस्साजोग बसस्टँड पासून तीनशे मिटर अंतरा वरील पुलाच्या खाली ट्रॅव्हल्स कोसळुन त्यात जयश्री जोंधळे, कान्होपात्रा करपेवाड, सीताबाई माळी आणि उषा रानेवाड हे चार प्रवासी जखमी होऊन कुठलीही जिवित हानी झाली नाही व चालकाच्या सतर्कतेमुळे या अपघातातील मोठा अनर्थ टळला. अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. व अपघात सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडला व केज पोलीस स्टेशनचे मस्साजोग बीटचे बीट अंमलदार सोपणे व त्यांचे कर्मचारी हे आपघात झाल्याच्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी 7.30 ते 7.45 च्या दरम्यान आले असता दैनिक रिपोर्टर चे मस्साजोग प्रतिनिधी अनंत जाधव हे अपघाताचे फोटो काढत असताना सोपने यांनी त्यांच्याशी अरेरावी केली. पत्रकाराशी अरेरावी करणार्या बीट अमलदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.