Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडवडवणीदेवळा ग्रा.पं.वरचा भाजपा झेंडा मतदारांनी उतरविला

देवळा ग्रा.पं.वरचा भाजपा झेंडा मतदारांनी उतरविला


वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या देवळा ग्रामपंचायतीवरुन भाजपाचा झेंडा मतदारांनी उतरवत आ.प्रकाश सोंळके यांच्या गटाला सहा जागेवर विजयी प्राप्त केला असुन भाजपाच्या विद्यमान सरपंच किसकिंदा महादेव रेडे यांना दणदणीत पराभव स्विकारावा लागला आहे.
वडवणी तालुक्यातील देवळा ग्रामपंचायतीचा निकाल आज साडेबारा वाजण्याच्या सुमारास लागला आहे.यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पुरस्कृत असणाऱ्या श्री.कानिफनाथ परिवर्तन महाविकास आघाडी पँनलचे सुशिल भगवानराव शिंदे,सौ.सिंधू अभिमान कदम,सौ.शितल सुरेश डोंगरे,सौ.सुषमा विजयकांत जावळे,सौ.शिल्पा सुरेश शिंदे,सौ.सिमा बालासाहेब डोंगरे या सहा जणांचा विजय झाला आहे.तर भाजपा पुरस्कृत असणाऱ्या कानिफनाथ ग्रामविकास पँनलचे सौ.निर्मला इंद्रमोहन जावळे, सौ. पल्लवी विठ्ठल शिंदे,पपेश अर्जुन पवार, सौ.पारुबाई भिमराव पवार,सौ.शिवकन्या देविदास सपकाळ या पाच जणांचा विजय झाला आहे.तर विद्यमान सरपंच असणाऱ्या या भागातील भाजपा पक्षाचे बलाढ्य नेते म्हणुन ओळख असणारे महादेव रेडे यांच्या पत्नी किसकिंदा महादेव रेडे यांना दणदणीत पराभव स्विकारावा लागला असून गत दहा वर्षापासून या ग्रामपंचातीवर भाजपाचा झेंडा होता.परंतु आजच्या निकालावरुन राष्ट्रवादी-६,भाजपा-५ असे गणित झाले असल्याने याठिकाणी भाजपाचा झेंडा उतरवत राष्ट्रवादीचा झेंडा रोवला असल्याने सरपंच व उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औचित्याचे असणार आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!