Saturday, March 6, 2021
No menu items!
Home बीड केज केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा


केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या. सात ग्रामपंचायतींचा निकाल हाती लागला असून यामध्ये सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला तर एक ग्रामपंचायत दुपारपर्यंत भाजपाच्या ताब्यात आली होती.
येवता, मुंडेवाडी, वाघेबाभुळगाव, काशीदवाडी, पाथरा, कोरडेवाडी या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकला तर बोबडेवाडी ही ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली. एकूण २३ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घोषीत झाल्या होत्या. ४ ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात आल्या होत्या तर १९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात निवडणुका लढवण्यात आल्या होत्या.

Most Popular

गढी येथील नवोदय विद्यालयातील १२ विद्यार्थी कोरोना बाधित ; जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट

नवोदय विद्यालयातील सर्व विद्यार्थी अध्यापक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करावी - जिल्हाधिकारी गेवराई (भागवत जाधव)

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या; सुने विरुद्ध गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)- सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात...

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह

सर्वाधिक बीडचे ३८बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कोविडने डोके वर काढले. काल ५७...

मांजरसुंबा घाटात ट्रक उलटला लोकांनी नारळ लुटले

बीड (रिपोर्टर)- मांजरसुंबा घाटात दिवसाआड अपघाताची मालिका सुरु असून आज सकाळी नारळ घेऊन बीडकडे येणारा एक टेम्पो पलटल्याने त्याला पाठिमागून दुसरे दोन...