बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात तर ४ ग्रामपंचायती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.
बीड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी परवा मतदान झाले. यामध्ये मैंदा-पोखरी, जिरेवाडी, वासनवाडी, तिप्पटवाडी, हाटकरवाडी, टाकळवाडी, भनकवाडी या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. सदरच्या ग्रामपंचायती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या. तर बहीरवाडी, आनंदवाडी, मोची पिंपळगाव, वायभटवाडी या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकला असून आ. संदीप क्षीरसागर यांचा या चार ग्रामपंचायतींवर वरचष्मा राहिला आहे. अन्य १२ ग्रामपंचायतींचे निकाल अद्याप येणे बाकी आहे.