Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडअनुकंप धारकाचे प्रस्ताव न.प. जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवत नाही २६ जानेवारी रोजी सफाई कामगाराचा...

अनुकंप धारकाचे प्रस्ताव न.प. जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवत नाही २६ जानेवारी रोजी सफाई कामगाराचा मुलगा करणार आत्मदहन


बीड (रिपोर्टर)ः- बीड नगर पालिका अनुकंप धारकाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवत नसल्याने अनेकांचे प्रस्ताव रखडून पडले. एका सफाई कामगारांच्या वारसाला नियमाप्रमाणे सेवेत घ्यायला हवे मात्र अद्यापही त्यास सेवेत घेण्यात आले नाही. सदरील या तरुणांने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा ईशारा दिला आहे.

तसे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. गौतम नामदेव वाघमारे हे बीड नगर पालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. दि. ०३-०७-२०१५ रोजी ड्युटीवर असतांना त्यांचा अपघात झाला. यामध्ये ते मरण पावले. नियमानूसार त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा सचीन गौतम वाघमारे यांना सेवेत घ्यायला हवे. तशी प्रकिया नगर पालीका प्रशासनाने केलेली नाही. सर्व कागदपत्र देवूनही नगर पालिकेने जिल्हाधिकारी यांच्याकडे रिक्त जागेची माहिती पाठविली नाही. प्रशासनाच्या सेवेमध्ये सचिन वाघमारे यांना घेण्यात आले नसल्याने त्यांच्या कुटूबींयावर उपासमारीची वेळ आली. या प्रकरणी त्यांनी आत्मदहन करण्याचा ईशारा दिला. २५ जानेवारी पर्यंत न्याय न मिळाल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे सचिन वाघमारे यांनी प्रसिध्दी पत्रकामध्ये म्हटले आहे.


न.प.च्या अधिकार्‍यांविरोधात कारवाई करा-वडमारे

नगर पालिकेच्या कामचुकार-पणामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. अनुकंप धारकांना नगर पालिका न्याय देत नाही. त्यांना आपल्या हक्कासाठी आत्मदहनाचा इशारा दयावा लागतो. वाघमारे प्रकरणी काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी नगर पालिका मुख्याधिकारी गुट्टे हे जबाबदार राहतील असा ईशारा के.के. वडमारे यांनी दिला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!