Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमखंडणी उकळणार्‍याच्या आवळल्या मुसक्या

खंडणी उकळणार्‍याच्या आवळल्या मुसक्या


बीड (रिपोर्टर)- आष्टी पोलिस ठाण्यात खंडणी आणि मारहाणीचे दोन गुन्हे दाखल असलेल्या तसेच पोलिसांना त्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी गणेश थोरात याच्या स्थानिक गुन्हे शाखेने रात्री मुसक्या अवाळल्या असून त्याला आष्टी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
२०१९ आणि २० मध्ये गणेश थोरात याने आष्टीत एकाला खंडणी मागितली होती. या प्रकरणी त्याच्या विरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तर एकाला गंभीर मारहाण केली होती. या प्रकरणीही आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. रात्री तो त्याच्या बीड येथील पंचशीलनगर भागातील घरी आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच रात्री पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारून त्याला ताब्यात घेत आष्टी पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष जोंधळे, कातखडे, जगताप, गायकवाड, कोरडे, वंजारे यांनी केली. त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी सहकार्य केले.

Most Popular

error: Content is protected !!