बीड (रिपोर्टर)- कोरोना रुग्णांच्या संख्येत कधी वाढ तर कधी घट होते. आज आलेल्या अहवालात चार तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही तर सात तालुक्यात १९ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला आज १९ जानेवारी रोजी ५१४ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १९ जण पॉझिटिव्ह तर ४९५ जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. सर्वाधिक पॉझिटिव्ह हे बीड शहरातील असून ते ९ आहेत. त्यापाठोपाठ अंबाजोगाईचे ५ तर आष्टी, धारूर, माजलगाव, शिरूर आणि वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.