Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडपरळीतील ग्रामपंचायत निकालांवर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, गावच्या विकासासाठी एकदिलाने...

परळीतील ग्रामपंचायत निकालांवर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, गावच्या विकासासाठी एकदिलाने काम करा


मुंबई: राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मागील आठवड्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बहुतेक नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम राखलं आहे. बलात्काराच्या आरोपांमुळं सध्या अडचणीत आलेले मुंडे यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर पहिली प्रतिक्रिया देत ते म्हणाले, गावांच्या विकासासाठी एकदिलाने काम करा, बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघातील १२ पैकी १० ग्रामपंचायतीवर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे. याबद्दल मुंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करा,’ असं म्हणत, निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. विजयानंतर जल्लोष करणार्‍या, गुलाल उधळणार्‍या कार्यकर्त्यांचे फोटोही त्यांनी ट्वीट केले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चुलत बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव करत धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघ खेचून आणला होता. मुंडे बंधू-भगिनींमधील राजकीय स्पर्धेमुळं परळीतील प्रत्येक निवडणूक नेहमीच चुरशीची आणि चर्चेचा विषय ठरते. आताची ग्रामपंचायत निवडणूकही त्यास अपवाद नव्हती. मात्र, धनंजय मुंडे यांनी त्यात वर्चस्व राखलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!