Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडपरळी‘प्रभू वैद्यनाथा ना. धनंजय मुंडेंवरचे शुक्लकाष्ट दूर कर’

‘प्रभू वैद्यनाथा ना. धनंजय मुंडेंवरचे शुक्लकाष्ट दूर कर’


परळीत नगरसेवकाने दोन कि.मी. दंडवत घालत प्रभू वैद्यनाथाची सपत्निक केली पुजा
परळी (रिपोर्टर)- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथीत आरोप झाल्यानंतर त्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट दूर होण्यासाठी परळीचे नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी तब्बल दोन कि.मी. मिटरचे अंतर दंडवत घालत प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक झाले. या वेळी आंधळे यांनी सहपत्नी प्रभू वैद्यनाथाची पुजा केली.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे गेल्या पंचेवीस वर्षांपासून सक्रिय राजकारणामध्ये आहेत. लोकाभिमूख काम करत असताना त्यांना सातत्याने संघर्ष करावा लागला. धनंजय मुंडे हे ध्येयवादी असल्याने प्रत्येक संकटावर ते मात करत राहिले आणि राज्याचं नेतृत्व करू लागले. परंतु त्यांच्या विरोधकांनी त्यांना सातत्याने अडचणीत आणण्याचे धोरण ठेवले. गेल्या आठवडाभरात धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने कथीत आरोप केले. यातून विरोधकांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केले.

Parali Corporator Gopal Andhale01

भाजपाने राजीनाम्यासाठी आंदोलन केले. मुखेंडे यांच्या पाठीमागे लागलेले हे शुक्लकाष्ट प्रभू वैद्यनाथ दूर करेल, अशी श्रध्दा बाळगून परळी येथील नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी काल दंडवत घालत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचे ठरवले. काल भाजपा महिला आघाडीने राज्यभर धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलन केले. इकडे परळीत मात्र त्यांच्या समर्थकांनी मुंडेंवरचे आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांना जाणीवपुर्वक बदनाम केले जात असल्याचे म्हटले. त्यातच गोपाळ आंधळे यांनी दोन कि.मी. साष्टांग दंडवत घालत प्रभू वैद्यनाथाचे मंदिर गाठले. वैद्यनाथाच्या चरणी सपत्निक पुजा करून हे प्रभू वैद्यनाथा ना.धनंजय मुंडे यांच्यावरचे शुक्लकाष्ट दूर कर म्हणत आंधळे दाम्पत्याने प्रभू वैद्यनाथाची पुजा केली.

Most Popular

error: Content is protected !!