Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडवडवणीवडवणी न.प.तीचे सीओ प्रशांत पाटील व इंजिनियर मेटे यांच्यात फिल्मीस्टाईल हाणामारी

वडवणी न.प.तीचे सीओ प्रशांत पाटील व इंजिनियर मेटे यांच्यात फिल्मीस्टाईल हाणामारी

वडवणी (रिपोर्टर):- कार्यालयीन कामकाज वेळेवर का होत नाही म्हणुन वडवणी नगरपंचायतीचे मुख्यधिकारी प्रशांत पाटील व इजिनिअर मेटे यांच्यामध्ये फिल्मी स्टाईलमध्ये हाणामारी झाली असुन यामध्ये मुख्यधिकारी जखमी झाले आहेत.


प्रथमदर्शी व्यक्तीकडून मिळालेली माहिती अशी कि,वडवणी नगरपंचायतीचे सिओ प्रशांत पाटील व इजिनिअर मेटे यांच्यामध्ये कार्यालयीन वेळेत कामकाजावरुन बोलाचाली झाली होती.याचाच मनात राग धरुन इंजिनिअर मेटे व सिओ पाटीलकार्यालयीन वेळ संपल्यानंतर बाहेर आले.तेव्हा गेट बाहेरच हामरीतुमरी करत बाचाबाची होत होत आसतानाच दोघांमध्ये फिल्मस्टाईलने हाणामारी झाली आहे.यात सिओ पाटील जखमी झाले असुन त्यांच्या हातातून रक्त निघत होते आसे सांगण्यात येत असून या हाणामारीनंतर दोघांनी हि वडवणी पोलीस स्टेशन गाठले आहे.हे भांडण कशामुळे झाले? कारण नेमके काय होते ? याचा सुगावा लागला नसून कामकाजावरुन भांडणे झाले आहेत.असे प्रथमदर्शी व्यक्तीकडून सांगण्यात येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!