आगामी निवडणुकीत भाजप-शिंदे सेनेची युती -बावनकुळे
मुंबई (रिपोर्टर) येणार्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदे सेना अशी युती राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा जास्त आणि विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा मिळवू, असा निर्धार भाजपाचे राज्याध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी व्यक्त केला आहे. बावनकुळे म्हणाले की, माजी मंत्री पंकजा मुंडे हे ज्येष्ठ नेतृत्व आहे. त्यांच्याकडे केंद्रीय जबाबदारी असून त्यांच्याकडे महाराष्ट्रात काही जबाबदारी नसेल, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
बावनकुळे यांनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सर्व लोकसभा जागांवर सक्षम बुथ मोहीम राबवत आहोत. एका बुथवर 30 कार्यकर्ते आणि प्रत्येक मतदार यादीच्या पेजवर एक कार्यकर्ता तैनात करण्याच्या योजनेवर आम्ही काम सूरू केलेले आहे. येणार्या निवडणुका शिंदे सेनेसोबत युती करून लढवण्यात येणार आहेत. राज्यात लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त आणि विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा जिंकू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पंकजा मुंडे हे ज्येठ नेतृत्व आहे. त्यांच्याकडे केेंद्रिय जबाबदारी आहे त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याकडे कसलीच जबाबदारी नसेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.