परळी (रिपोर्टर) एक वर्षाच्या मुलीस शहरातील रांदड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान मुलीचा मृत्यू झाला असून डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणी परळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परळी शहरामधील रांदड हॉस्पिटलमध्ये काल सायंकाळी एका मुलीला दाखल करण्यात आले होते. सदरील मुलगी एक वर्ष वयाची होती. या मुलीस निमोनिया झाला होता, असे निष्पन्न झाले होते. आज सकाळी उपचारा दरम्यान मुलीचा मृत्यू झाला. डॉक्टराने उपचारात हयगय केल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मुलीच्या मृत्यूनंतर रुग्णालयामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला होता. या ठिकाणी मुलीचे नातेवाईक जमा झाले होते. या प्रकरणी परळी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.