Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईममाजलगावात स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धाड दहा जुगार्‍यांना घेतले ताब्यात

माजलगावात स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धाड दहा जुगार्‍यांना घेतले ताब्यात

50 हजाराचा मुद्देमाल जप्त
बीड (रिपोर्टर)- ऑनलाईन बिंगो चक्री आणि शुटबॉल नावाचा जुगार खेळवणार्‍या दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने धाडी टाकून त्यामध्ये 10 जुगार्‍यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह नगदी असा एकूण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई माजलगाव शहरात करण्यात आली असून या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव शहरातील रंगोली टी कॉर्नर येथे पत्र्याच्या शेडमध्ये आकाश बबन घुगे हा त्याच्याकडे येणार्‍या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना 10 रुपयात 100 रुपये देण्याचे आमिष दाखवून शुटबॉल नावाचा जुगार खेळवित होता. याची माहिती पोलिसांना मिळताच या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता या वेळी जुगार खेळताना शेख यूनुस शेख यूसुफ (रा. इंदिरानगर, माजलगाव), संतोष कांबळे (रा. पंचशील नगर), करिमोद्दीन अंसार शेख (रा. इंदिरानगर), मनोज शिंगारे, शेख शकील शेख वजीर (रा.चांदणी ग्राऊंड), शेख मिन्हाज नाजीम (अशोक नगर, माजलगाव), शेख मकसुद्दीन शेख मकसूद मुसा (रा. भोसलेनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या आरोपींकडून 8 हजार 600 रुपये नगदी व 28 हजार रुपयांचे आठ मोबाईल आणि 3 हजारचे शुटबॉल खेळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 39 हजार रुपये 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर दुसरी कारवाई नवीन बसस्टँड जवळ करण्यात आली. यामध्ये शेख अमजद, शेख इब्राहीम हा ऑनलाईन बिंग चक्री नावाचा जुगार खेळत व खेळवित होता. या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून शेख अमजद शेख इब्राहीम (रा. आझादनगर, माजलगाव) व आकाश प्रकाश भिसे (रा. इंदिरानगर, माजलगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये त्यांच्याकडून ऑनलाईन बिंगो चक्री जुगाराचे साहित्य व नगदी असा एकूण 8 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आनंद कांगुणे आणि त्यांच्या टिमने केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!