Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeआरोग्य & फिटनेसअज्ञात आजाराने उमरद खालस्यात शेळ्या दगावल्या

अज्ञात आजाराने उमरद खालस्यात शेळ्या दगावल्या


पशूवैद्यकीय अधिकार्‍यांची घटनास्थळी जावून पाहणी
बीड (रिपोर्टर)- बर्ड फ्ल्युचा व्हायरस आल्याने अनेक पक्षी मरण पावले आहेत. यामुळे पोल्ट्री व्यवसायिकात खळबळ उडाली असतानाच बीड तालुक्यातील उमरद खालसा येथे गेल्या दोन दिवसात चार शेळ्या अज्ञात आजाराने मरण पावल्या आहेत. या घटनेची माहिती पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना झाल्यानंतर आज सकाळी मोरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व तेथील शेतकर्‍यांशी चर्चा केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये बर्ड फ्ल्युचा संसर्ग आला, या संसर्गामुळे अनेक जिल्ह्यातील कोंबड्या मरण पावल्या आहेत. त्यातच आता बीड तालुक्यातील उमरद खालसा येथील चार शेळ्या दगावल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दत्तात्रय बाबासाहेब प्रभाळे यांची एक आणि संपत सोनवणे यांच्या तीन अशा चार शेळ्या मरण पावल्या आहेत. या घटनेची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी मोरे यांना दिल्यानंतर त्यांनी आज सकाळी गावात जावून इतर शेळ्यांची पाहणी केली व पशुपालकांशी चर्चा केली. सदरील या शेळ्या कुठल्या कारणावरून दगावल्या हे मात्र समजू शकले नाही.

Most Popular

error: Content is protected !!