Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडशिक्षण विभागाची खातेनिहाय चौकशी करा जि.प.कार्यालयासमोर धरणे आंदोलन

शिक्षण विभागाची खातेनिहाय चौकशी करा जि.प.कार्यालयासमोर धरणे आंदोलन


बीड (रिपोर्टर)- माध्यमिक शिक्षण विभागाची खातेनिहाय चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी नवनिर्माण संघाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरे आंदोलन ग्रामपंचायत कार्यालयाच्या विरोधात सुरू आहे.
अनुसूचित जमातीच्या आरक्षणातील ज्या शिक्षकांनी अद्यापपर्यंत वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांना नोकरीवरून ताबडतोब कार्यमुक्त करावे तसेच त्यांना दिलेला पगार व इतर लाभ हा जमीन महसूलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करावा, प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण विभागाची खातेनिहाय चौकशी करावी या मागणी भ्रष्टाचार विरोधी नवनिर्माण सघाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या वेळी नवनाथ रोहितास काळे यांच्यासह आदींची उपस्थिती आहे तर दुसरे आंदोलन नागझरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या विरोधात करण्यात येत आहे. येथील सरपंच व ग्रामसेवकाने मनमानी करून जीओ टार्गेट उभा करण्यास नाहरकत दिले. याबाबत चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मुरकुटे बाबाराव, नवनाथ मुरकुटे, भीमराव घडसिंगे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. हे जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण करत आहेत. याबाबत माजलगाव गट शिक्षणाधिकारी कार्यालयांच्याकडे करण्यात आली होती मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!