Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनापाच तालुके निल, सहा तालुक्यात ३० कोरोना बाधीत

पाच तालुके निल, सहा तालुक्यात ३० कोरोना बाधीत


बीड (रिपोर्टर)- कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत असून रोज शेकडोंवर संशयितांची कोरोना तपासणी केली जात आहे. काल ५६१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असता यामध्ये ३० जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. यात ५ तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. तर दुसरीकडे जिल्ह्यातून ४५ रुग्णांची दवाखान्यात आज सुट्टी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ११ तालुक्यातून तब्बल ५६१ कोरोना संशयितांची तपासणी करण्यात आल्यानंतर आज सकाळी साडे अकरा वाजता अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये ५३१ जण निगेटिव्ह आढळून आले तर ३० जण कोरोना बाधीत आढळून आले. जिल्ह्यातील पाटोदा, शिरूर, वडवणी, धारूर, माजलगाव या पाच तालुक्यात आज एकही रुग्ण आढळून आला नाही. तर सर्वाधिक रुग्ण हे बीड तालुक्यात आढळून आले असून यातील बहुतांशी रुग्ण हे बीड शहरातील आहेत. अंबाजोगाई ६, आष्टी १, बीड १६, गेवराई १, केज १, परळी २, रुग्ण आढळून आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!