Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडएसपी राजा रामास्वामी हरकतमध्ये अंबाजोगाईत झन्नामन्ना जुगारावर छापा

एसपी राजा रामास्वामी हरकतमध्ये अंबाजोगाईत झन्नामन्ना जुगारावर छापा

नगदी साडेसात लाख रुपयांसह १८ लाख ५९ हजाराचा ऐवज जप्त
२७ जुगार्‍यांना घेतले ताब्या, अंबाजोगाई शहरासह राज्यभरातून जुगारी आले होते खेळायला

अंबाजोगाई (रिपोर्टर)- जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी हरकतमध्ये आल्याचे दिसून येत असून अंबाजोगाई शहरात सुरू असलेल्या झन्नामन्ना जुगार अड्‌ड्यावर एसपींच्या पथकाने छापा मारून नगदी रोख ७ लाख ५७ हजार रुपये जप्त करून जुगार्‍यांच्या तब्बल ११ मोटारसायकली आणि अन्य ऐवज असा एकूण १८ लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. २७ जुगार्‍यांना जेरबंद करण्यात आले असून सदरची कारवाई मोरवाडी शिवारातील शेतात करण्यात आली. तीन टेबलवर प्रत्येकी ९ जुगारी झन्नामन्ना जुगार खेळताना आढळून आले.
अंबाजोगाई शहरात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे विशेष पथक अंबाजोगाईत पाठवले. अंबाजोगाई-लातूर रोडवरील मोरेवाडी शिवारात झन्नामन्ना जुगार सुरू असल्याची माहिती या पथकाला मिळताच रात्री साडेनऊ वाजता पथकाने तिथे धाड मारली. या वेळी तीन टेबलवरील २७ जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी त्यांच्या ११ मोटारसायकली आणि एक चारचाकी वाहनही जप्त केले तर नगदी ७ लाख ५७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य मोबाईल असा एकूण १८ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जुगार्‍यांमध्ये नासेर खान शेरखान, सतीश धोंडीराम चामनर, दत्ता गोविंदराव साखरे, विशाल पंडीतराव चाटे, सय्यद सुल्तान सय्यद दस्तगीर, सचिन बालासाहेब गुळभिले, वाहेद बेग खलील बेग, आनंद जगन्नाथ कदम, पुरुषोत्तम संजय कदम, अक्षय विश्वांभर काळे, निलेश अशोक फड, अहमद इब्राहिम बागवान, अमोल दिलीपराव लोमटे, नितीन उर्फ तुळशीराम पांडुरंग यादव, राम बली निसार, नितेश मधुकर वैद्य, ज्ञानेश्‍वर ऊर्फ माऊली नारायणराव पतंगे, भगवान विठोबा वैद्य, नितीन कैलास साठे, राहूल भगवानराव रेणापुरे, सय्यद इलाही पाशा, देवीदास काशीनाथ चौघुले, गोविंद राजाभाऊ शेप, एजाज शेख फरहाद, अनिल मुकुंदराव पिसाळ, भैरोनाथ सिद्धराम घोगरे, प्रमोद सिद्धराम आप्पा पोखरकर, अशी २७ जुगार्‍यांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख एपीआय विलास हजारे, आरसीपीचे पो.ना. राऊत, पो.कॉ. बास्टेवाड, मोरे, इनामदार, कोलगवाड, तौर यांनी केली.

केज तालुक्यातही जुगार अड्‌ड्यांवर कारवाई
केज पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्‌ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. राजू बंडू सावंत (वय ३५, रा. धारूर) याच्याकडून ७ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर महेश साहेबराव उमाप (उवय ३७, रा. पळसखेडा) याच्याकडून ३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संतोष मुक्तीराम वाणी (वय ३२, रा. धारूर) याच्याकडून एक हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पो.नि. जोंधळे, बांगर, गर्जे यांनी केली.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!