Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडबीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर...

बीड न.प.च्या विषय समित्या जाहीर बांधकाम मुळुक यांच्याकडे तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव

बीड (रिपोर्टर)- बीड नगरपालिकेच्या विषय समित्या आज दुपारी जाहीर करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक यांची तर शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. विषय समितीच्या निवडीसाठी आज नगरपालिकामध्ये विशेष सभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेमध्ये सर्वानुमते सभातीपदाच्या निवडी घोषीत करण्यात आल्या. बांधकाम सभापतीपदी विनोद मुळुक, नियोजन सभापतीपदी सुशिला नरसिंग नाईकवाडे, स्वच्छता सभापतीपदी हेमंत क्षीरसागर, पाणीपुरवठा सभापतीपदी सय्यद इलियास, शिक्षण सभापतीपदी भास्कर जाधव, महिला सभापतीपदी अश्‍विनी गुंजाळ तर स्थायी समितीवर विकास जोगदंड यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टिळेकर यांनी काम पाहिले.

Most Popular

error: Content is protected !!