Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमसाक्षाळपिंप्रीत तहसीलदारच्या पथकाला धक्काबुक्की

साक्षाळपिंप्रीत तहसीलदारच्या पथकाला धक्काबुक्की


गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू; सिंदफना नदीतील वाळू ट्रॅक्टरमध्ये घेवून जातांना पकडले होते
बीड (रिपोर्टर):- बीडचे तहसीलदार सुशांत शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर विशेष करून वाळू आणि इतर गौण खनिजाकडे विशेष लक्ष देवून आहेत. गेल्या दोन महिन्यात वाळू तस्करांचे शासकीय कर्मचार्‍यांवर होणारे हल्ले वाढल्याने प्रशासनाचे मनोबल खचले नसून उलट प्रशासन डेअरींगने कामाला लागलेले दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी तहसीलदार पथकातील तलाठ्यांनी वाळूचा ट्रॅक्टर पकडल्यानंतर तीन तलाठ्यांना वाळू तस्करांनी धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळून नेल्याची घटना साक्षाळप्रिंप्री गावात घडली असून या प्रकरणी संबंधित तलाठी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत.
तहसीलदार सुशांत शिंदे यांच्या पथकाने काही दिवसापुर्वीच मुरूमची अवैध वाहतुक करतांना हायवावर कारवाई केली. ही कारवाई ताजी असतांना पुन्हा शुक्रवारी तहसीलदार यांच्या पथकाने सिंदफना नदीतील वाळू एका ट्रॅक्टरमध्ये जात असतांना बहाद्दरपुर ते सोनगाव या रस्त्यावर पकडली. संबंधित ट्रॅक्टर चालकाने इतर मित्रांसोबत मिळून संबंधित तलाठ्यांना दाटी धमकी देवून धक्काबुक्की केली. ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेवून पळून जावू नये म्हणून कुलकर्णी नावाचे तलाठी त्या ट्रॅक्टरमध्ये बसले असता त्यांना ट्रॅक्टरमधून ओढून बाहेर काढले. संबंधित ट्रॅक्टर चालकाने वाळू रस्त्यातच टाकून दाटी धमकी देवून ट्रॅक्टर पळवून नेला. या प्रकरणी संबंधित तलाठी एस.बी.सानप, एस.एस.कुलकर्णी, पी.डी.सानप या तिघांनी वरील घटनेची माहिती तहसीलदार सुशांत शिंदे यांना दिल्यानंतर नियमाने संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयातून सुरू असून बीड ग्रामीण पोलीस या प्रकरणी चौकशी करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!