Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeबीडपरळीपरळी न.प.च्या पाणीपुरवठा सभापतीपदी उर्मिला मुंडे

परळी न.प.च्या पाणीपुरवठा सभापतीपदी उर्मिला मुंडे


परळी (रिपोर्टर)- परळी नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापतींची आज बिनविरोध निवड करण्यात आली पालिका सभागृहात या निवडणुकीसाठी केवळ पाच जणांचे अर्ज दाखल झाल्याने सदरची निवड बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी जाहीर केले.
परळी नगर परिषदेचा विषय समिती सभापती निवडीसाठी आज न.प. सभागृहात विशेष सभा पार पडली या सभेला पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे या उपस्थित होत्या .या विशेष सभेत निवडण्यात आलेले सभापती पुढील प्रमाणे स्वच्छता समिती – अन्वर मिस्कीन, पाणीपुरवठा – ऊर्मिला गोविंद मुंडे, बांधकाम अन्नपूर्णा आडेपवार, महिला व बालकल्याण- गंगासागर शिदे आणि शिक्षण सभापती म्हणून गोपाळ आंधळे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत सर्वाधिक महत्त्वाचे असलेल्या बांधकाम समितीचे सभापती पद अन्नपूर्णा आडेपवार यांच्याकडे गेले असून, स्वच्छता विभाग सदस्य अन्वर मिस्कीन यांच्याकडे देण्यात आला आहे. गोपाळ आंधळे एकाच टर्म मध्ये तिसर्‍यांदा शिक्षण समिती सभापती म्हणून निवडले गेले आहे. आजच्या विशेष सभेला सर्व नगरसेवक उपस्थित होते. आम्ही सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात चांगले काम करू असा विश्वास यावेळी बोलताना नवनिर्वाचित सभापतींनी व्यक्त केला.नुतन पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!