Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडअंबाजोगाईअंबाजोगाई न.प. सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध

अंबाजोगाई न.प. सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध


अंबाजोगाई (रिपोर्टर)- नंदकिशोर मुंदडा यांच्या गटाला बाजुला सारत भाजपाच्या दोन सदस्यांना स्वीकारत कॉंग्रेस -राष्ट्रवादीने आज नगरपालिकेच्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध काढली असून स्थायी समितीवर दोन सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
अंबाजोगाई नगरपालिकेच्या सभापतीपदाची निवडणूक उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी शरद झाडके यांच्या उपस्थितीत पार पडली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाच्या दोन सदस्यांना स्थायी समितीमध्ये सामील करून घेण्यात आले असून केवळ नंदकिशोर मुंदडा यांच्या गटाला यामधून वगळण्यात आले आहे. बांधकाम सभापती आसिफोद्दीन खतीब, पाणीपुरवठा सभापती शेख रफिकाबेगम अनिसोद्दीन, नियोजन सभापती जमनोद्दीन काझी, महिला बालकल्याण शमीम बेगम शेख रहीम, शिक्षण सभापती कांचन हनुमंत तौर तर स्थायी समिती बबिता आदमाने, कमलाकर पोपले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!