Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमबीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर...

बीडच्या डीवायएसपी विरुद्ध मुंबईत बलात्काराचा गुन्हा डीवायएसपी वाळके म्हणाले, तपासात सत्य बाहेर येईल


मुंबई/बीड (रिपोर्टर)- बीडचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोेष वाळके यांच्या विरोधात मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सदरचा गुन्हा सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या महिलेने केल्याने वाळके यांच्या अडचणीत वाढ झाली असून ते सध्या रजेवर असल्याचे सांगण्यात येते. रिपोर्टरने थेट वाळके यांना भ्रमणध्वनीवरून सदरच्या प्रकरणाविषयी विचारले असता तपासात सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया दिली.
इ.स. २०१९ साली मुंबई येथे कार्यरत असताना आपल्यावर अत्याचार केल्याचा खुलासा एका सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या महिलेने केला आहे. या प्रकरणी मुंबई येथील रफी अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून विद्यमान पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या विरोधात दोन दिवसांपुर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळके हे गेल्या काही महिन्यांपुर्वीच बीड येथे रुजू झाले होते. त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. वाळके सध्या रजेवर असल्याचे सांगण्यात येते. रिपोर्टरने थेट वाळके यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदरच्या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर सर्व काही सत्य बाहेर येईल.

Most Popular

error: Content is protected !!