Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeराजकारणअखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे


मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर या प्रकरणात सत्याचा विजय झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा खोटा आरोप करत या महिलेने खळबळ उडवून दिली होती.
कौटुंबिक कारणास्तव मी केस मागे घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी याबाबत रेणू शर्मा यांच्याकडून लेखी शपथपत्र घेतले असल्याचेही समजते. आरोप होताच भाजपने धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, मात्र मुंडेंनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत, रेणू शर्मा यांच्या विरुद्ध ब्लॅकमेलिंग चा आरोप केला होता. या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन सत्य बाहेर येउ द्या अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने घेतली होती. दरम्यान गेल्या आठ ते दहा दिवसांत या आरोपांनी सबंध महाराष्ट ढवळून निघाला होता, मात्र धनंजय मुंडे यांच्या बोलण्यात मात्र अंतविश्वास दिसत होता. अगदी आरोप झाल्याच्या दुसर्‍या दिवशी ना. मुंडे जनता दरबार घेताना दिसले होते. दरम्यानच्या काळात लोकांच्या भेटीगाठी, दैनंदिन कामकाज, बीड जिल्ह्यातील कामकाज, जनता दरबार आदी उपक्रम त्यांनी नियमित सुरू ठेवल्याने ते आश्वासक वाटत होते. या काळात रेणू शर्मा यांच्या विरुद्ध ब्लॅकमेलिंग सह विविध तक्रारी दाखल झाल्याने प्रकरण रेणू यांच्यावरच उलटणार की काय अशी चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मात्र सुरुवातीपासून सावध भूमिका घेत, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची गरज नसून, या प्रकरणात काय ती चौकशी होऊन सत्य बाहेर येऊद्या अशी भूमिका घेतली होती. अखेर सत्य बाहेर आले असून, रेणू शर्माने आपली तक्रार मागे घेतल्याने आता मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. तर रेणू शर्मा ने अर्ध्यात माघार घेतल्याने त्यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनीही ही केस सोडत असल्याचे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांनी या प्रकरणी सत्यता पडतळल्याशिवाय निष्कर्षाला येणे योग्य नाही, या प्रकरणात चौकशी करून खोलात जाण्याची गरज आहे, अशी भूमिका घेतली होती. आज रेणू शर्मा यांनी माघार घेतल्यानंतर खा. पवार यांनी आपण घेतलेली भूमिका योग्यच होती असा पुनररुच्चार केला आहे.

मी आधीच सांगितलं होतं… -शरद पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. दरम्यान या प्रकरणावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. आरोपांच्या मूळाशी जाण्याची गरज आहे, असं मी आधीच म्हटलं होतं. सत्य समजल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अर्थ नाही. आम्ही योग्य होतो, हे सिद्ध झालय असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!