Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडइमारतीचे पाणी रस्त्यावर; नागरिकांना येता-जाता त्रास न.प.लानालीचा पडला विसर

इमारतीचे पाणी रस्त्यावर; नागरिकांना येता-जाता त्रास न.प.लानालीचा पडला विसर


बीड (रिपोर्टर)- शाहूनगर भागातील एका इमारतीचे पाणी रस्त्यावरच पडत असल्याने याचा त्रास रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना सहन करावा लागतो. नगरपालिकेने या रस्त्यावर नाली बांधलेली नाही त्यामुळे हे पाणी रस्त्यावरून वाहते. सदरील पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी व रिक्षा चालकांनी केली आहे.
पांगरी रोडवरील सागर गॅरेजच्या बाजुला असलेल्या एका इमारतीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्यावरील पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर या ठिकाणी रिक्षा पॉईंट असून रस्त्यावर पॅसेंजर थांबत असल्याने रस्त्यावरचे पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. रस्त्याच्या बाजुने पाणी नसल्याने पाणी जाण्यास जागा नाही. नगरपालिकेला नाली बांधण्याबाबत विसर पडला की काय, असा प्रश्‍न पडला आहे. सदरील रस्त्यावरच्या पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी रिक्षा चालकांकडून करण्यात आली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!