Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमविवाहितेला मारहाण सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल

विवाहितेला मारहाण सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर):- एका ३२ वर्षीय विवाहितेला सासरच्या लोकांनी मारहाण केल्या प्रकरणी तिच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीसात नवरा, सासरा, दीर, भाया, नणंद, जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
परळी शहर पोलीसात रेखा बालाजी दौंड या ३१ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.२२ रोजी रात्री ८.३० वाजता तिच्या घरी प्रियानगर परळी वैजनाथ येथे महादु विक्रम दौंड, विक्रम सटाजी दौंड, नरसिंग विक्रम दौंड, बालाजी विक्रम दौंड, शिवकन्या महादु दौंड, वैष्णवी विक्रम दौंड सर्व रा.प्रियानगर परळी यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून वरील सर्वांविरोधात परळी पोलीस शहर पोलीस ठाण्यात कलम १४३, ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार लांडगे हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!