Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीड२६ जानेवारी रोजी प्रादेशिक सहसंचालक कारखान्याला खेटराची माळ घालणार - थावरे

२६ जानेवारी रोजी प्रादेशिक सहसंचालक कारखान्याला खेटराची माळ घालणार – थावरे


बीड (रिपोर्टर)- गेटकीनच्या उसाबाबत प्रादेशिक सहसंचालक कार्यालय गंभीर नाही, अनेक वेळा निवेदने दिले, आंदोलन केले मात्र याची दखल संबंधित कार्यालय घेत नसल्याने २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर कार्यालयाला खेटराची माळ घालण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभीषण थावरे यांनी दिला आहे.
माजलगाव तालुक्यातील कारखानदार स्थानिकचा ऊस घेण्याऐवजी बाहेरून गेटकीन पद्धतीने ऊस आणतात. यासाठी अनेक वेळा थावरे यांनी आंदोलन केले. प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाला निवेदन दिले. त्या कार्यालयासमोर आंदोलन देखील केले मात्र याबाबत ठोस निर्णय सदरील कार्यालयाने घेतलेला नाही. शेतकरी आणि कारखानदार यांच्या बैठकीबाबत कार्यालय उदासिन भूमिका घेत आहे त्यामुळे शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात असून २५ तारखेपर्यंत कार्यालयाने ठोस निर्णय न घेतल्यास २६ तारखेला ध्वजारोहण नंतर कार्यालयाला खेटराचा हार घालण्यात येणार असल्याचे गंगाभीषण थावरे यांनी म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!