Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeकोरोनाआत्तापर्यंत जिल्ह्यात १७ हजार ५४९ जणांना कोरोनाची बाधा आज नव्या ५० रूग्णांची...

आत्तापर्यंत जिल्ह्यात १७ हजार ५४९ जणांना कोरोनाची बाधा आज नव्या ५० रूग्णांची भर


२९ जणांनी केली कोरोना मात
बीड (रिपोर्टर):- गेल्या काही दिवसापासून कोरोना गेला असल्याचे समजून नागरिक सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरत आहेत. कुठलेही सोशल डिस्टंस पाळत नसल्याने पुन्हा कोरोनाच्या रूग्णात झापट्याने वाढ होवू लागली आहे. आज आलेल्या ७४२ अहवालात तब्बल ५० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर आज २९ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे. आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात एकूण १ लाख ९२ हजार ३७४ संशयितांच्या तपासण्यात करण्यात आल्या असून त्यामध्ये १७ हजार ५४९ जण बाधित आढळून आले आहेत.
पुन्हा कोरोनाच्या रूग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसापासून आलेल्या अहवालात ५० च्या आत रूग्ण संख्या होती. मात्र आज आलेल्या अहवालात ५० जण पॉझिटिव्ह आढळून आल्यास जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाकडे दुर्लक्ष न करता मास्क, सॅनिटायजर वापरून गर्दीत जाणे टाळण्याचे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. आत्तापर्यंत १७ हजार ५४९ पॉझिटिव्ह पैकी १६ हजार ७४४ जणांनी कोरोना वर मात केली आहे. तर ५५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यू दर वाढला असून तो तब्बल ३.१३ वर जावून पोहचला आहे. आज दुपारी ७४२ संशयितांचे अहवाल आले असून ५० जण पॉझिटिव्ह तर ६९२ जण निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई १२, आष्टी २, बीड १६, केज ६, माजलगाव १, परळी ३ आणि शिरूर तालुक्यात १० रूग्ण आढळून आले आहते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!