Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडजोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावर
दागली तोफ

बीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी पार्टीचे आंदोलन सुरू असताना याची दखल नगरपालिका प्रशासन घेत नाही म्हणजे ही निंदनीय बाब असून जोपर्यर्ंंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसून राहील, असा इशारा आम आदमी पार्टीचे विभागीय अध्यक्ष डॉ. माने यांनी दिला.
आंदोलनस्थळी डॉ. सुभाष माने यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रस्त्याच्या प्रश्‍नासाठी आम आदमी पार्टीचे आंदोलन सुरू आहे नागरी समस्यांकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, नगरपालिका प्रशासन यांच्याविरोधात शहरवासियात संतापाची लाट निर्माण झाली आहे नगरपालिका प्रशासन जाणीवपुर्वक रस्त्याचे काम करत नसल्याचा आरोपही डॉ. सुभाष माने यांनी केला. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अशोक येडे, ज्ञानेश्‍वर राऊत, सय्यद सादेक, जमाले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!