बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही मुलगीच झाल्याने केल्याचे समजते. जखमी महिलेस बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्रियंका विशाल घुगे (रा. कळंब) या महिलेला दुसरी मुलगीच झाली. मुलगीच झाल्याचे कारण पुढे करत तिचा पती विशाल घुगे याने रात्री प्रियंका हिला बेदमपणे मारहाण केली. प्रियंका हिचे माहेर बीड असल्याने तिने आपल्या घरच्यांना ही माहिती सांगितल्याने जखमी महिलेस बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान सदरील महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल असल्याचेही सांगण्यात आले.