Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईमराठवाड्यातील मुलींसाठी पुण्यात सर्व सोयीयुक्त वस्तीगृह उभारणार

मराठवाड्यातील मुलींसाठी पुण्यात सर्व सोयीयुक्त वस्तीगृह उभारणार


मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांचा गेवराईत भव्य सत्कार
गेवराई (रिपोर्टर) -मराठवाड्याच्या मातीतील मतदारांनी मागच्या तीन टर्म मधून मला निवडून दिले त्यामुळे हा विजय माझा एकट्याचा नसून तो या विभागातील तरुणांचा आहे. मोठया फरकाने झालेल्या या विजयामुळे माझी नक्किच जबाबदारी वाढली असून येणार्‍या काळात या विभागातील ग्रामीण भागातील मुलींसाठी पुण्यात सर्वसोयीनियुक्त भव्य वस्तीगृह उभारणार असल्याचा विश्वास मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश भाऊ चव्हाण यांनी व्यक्त केला.
गेवराई येथील र भ अट्टल महाविद्यालयात आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडीत, माजी राज्यमंत्री तथा शिवसेना नेते बदामराव पंडित, जि. प.सदस्य फुलचंद बोरकर, भवानी बँकेचे संचालक पापा मोटे, भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन पाटील काळे, दीपक आतकरे, राधेशाम येवले, प्रा.एल.आर.धुमाळ, ऍड.सुभाष निकम, युवा नेते रोहित पंडित, श्रीनिवास बेदरे, ऋषिकेश बेदरे, जगन्नाथ शिंदे,कुमारराव ढाकणे प्राचार्या रजनी शिखरे, यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान यावेळी अमरसिंह पंडित यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार सतिषभाऊ चव्हाण भव्य नागरी सत्कार करून त्यांना भावी कार्यासाठी सदिच्छा दिल्या. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, येणार्‍या काळात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी मागील काळात मी ७०-३० सारखा मुद्दा लावून धरला त्यामुळे याचा निर्णय झाला असून यातून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला यापूर्वी आपल्याकडची ५०० ते ६०० विद्यार्थी मेडिकल ला लागत होते मात्र या निर्णयामुळे पहिल्याच टप्यात जवळपास १३०० विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला. यापुढे २००५ नंतरच्या पेन्शन धारकांचा प्रश्न येत्या काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील बेकारीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. मात्र हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेद्रा वसाहतीच्या माध्यमातून या ठिकानी ६० टक्के व्यवसाय हे मराठवाड्यातील तरुणांसाठी राखीव असतील याबाबत मी वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. तसेच ग्रामीण भागातील मुलींसाठी वसतिगृहाच्या माध्यमातून सर्व सोयी उपलब्ध करून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार असून याच बरोबरच आपल्या विभागातील ज्या काही मागण्या असतील त्या येणार्‍या काळात नक्कीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्राचार्या रजनी शिखरे,प्रा.धुमाळ यांच्यासह आदींनी आपले मनोगत व्यक्त करून आमदार सतीश चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बब्बूभाई बारुदवाले, अवेझ शरीफ, संदीप मडके, जालिंदर पिसाळ, झुंबर निकम, राधाकिसन पवार, दत्ताभाऊ दाभाडे, मुजीब पठाण यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मराठवाड्यात गुणवत्तेची
खाण -अमरसिंह पंडित

मराठवाडा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असला तरी या भागामध्ये गुणवत्तेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. आ. सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून ७०-३० चा फॉर्म्युला रद्द झाला हे पुण्यकर्म वाया जाणार नाही, येत्या काळात याचा मोठा लाभ होणार असून बीड जिल्ह्यात विद्यापीठांची शाखा निर्माण व्हावी, अशी मागणी या वेळी अमरसिंह पंडित यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!