Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीड४३ वर्षीय महिलेस हृदयाचा आजार उपचारासाठी १५ लाखांची गरज दानशुरांनी मदत करण्याचे...

४३ वर्षीय महिलेस हृदयाचा आजार उपचारासाठी १५ लाखांची गरज दानशुरांनी मदत करण्याचे आवाहन


बीड (रिपोर्टर)- शहरातील शुक्रवारपेठ भागात राहणार्‍या एका रिक्षा चालकाच्या पत्नीचे हृदय ट्रान्सफर करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च येत आहे. परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने सदर महिलेस उपचारासाठी मदतीची गरज आहे. दानशुरांनी ऑपरेशनसाठी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


आशा भगवान थोरात (वय ४३) या महिलेला हृदयाचा आजार जडला. सदरील महिलेस हृदय ट्रान्सफर करण्याची गरज आहे. त्यासाठी १५ लाख रुपये खर्च लागत आहे. इतके पैसे खर्च करण्याची ऐपत महिलेच्या पतीकडे नाही. महिलेचा पती रिक्षा चालक असून महिलेच्या उपचारासाठी दानशुरांनी मदत करावी, असे आवाहन भगवान थोरात यांनी केले आहे. ज्यांना मदत करायची आहे त्यांनी कऊऋउ खाते क्र. ५०१००३८३०९५६६० (आयएफसी कोड कऊऋउ०००१७८४)या खाते क्रमांकावर मदत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी भगवान थोरात (मो. नं. ९८२२६७३३६९) व विनय थोरात (मो.नं. ८८३०७७२०१०) यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!