Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमपत्नीस मारहाण प्रकरणी पतीविरोधात ३०७ चा गुन्हा आरोपी फरार, अन्य सहा लोकांविरोधातही...

पत्नीस मारहाण प्रकरणी पतीविरोधात ३०७ चा गुन्हा आरोपी फरार, अन्य सहा लोकांविरोधातही कारवाई


बीड (रिपोर्टर)- दुसरी मुलगी झाली या कारणावरून पतीने पत्नीस बेदमपणे मारहाण करत अंगावर रॉकेल ओतून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब रोडवर असलेल्या विठ्ठलनगर भागात घडली. जखमी महिलेवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री दोन वाजता या प्रकरणी पतीसह अन्य सहा लोकांविरोधात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रियंका विशाल घुगे या महिलेचे गेल्या काही वर्षांपुर्वी कळंब येथील विशाल घुगे याच्याशी लग्न झाले. या महिलेला दोन मुली आहेत. दुसरीही मुलगीच झाली म्हणून सदरील महिलेस पती विशाल घुगे याने बेदमपणे मारहाण करत तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यातून महिलेने आपली कशीबशी सुटका करून बीड गाठले. या कामी विशाल घुगे याला त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मदत केली.

ph

जखमी महिलेवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेची फिर्याद नोंदवून घेण्यासाठी कळंबचे पोलिस काल बीड येथे आले होते. महिलेने आपला जवाब पोलिसांकडे नोंदवला. त्यानुसार रात्री दोन वाजता आरोपी विशाल घुगे, काशीबाई सांगळे, प्रकाश सांगळे, विजयमाला गिते, कोमल संतोष वाघमारे, अक्षय गिते यांच्या विरोधात कलम ३०७, ४९८ (अ), ३२४, १०९, ५०६ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!