Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडमुलींचे सशक्तीकरण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकू -ना. धनंजय मुंडे

मुलींचे सशक्तीकरण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकू -ना. धनंजय मुंडे


बीड (रिपोर्टर)- स्त्री-पुरुष समानता हा कोणत्याही देशाच्या शक्तीचा गाभा आहे, असे म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देत मुलींचे सशक्तीकरण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकू, असा विश्‍वास महाराष्ट्राला दिला. त्यांनी ट्विटद्वारे राष्ट्रीय बालिका दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.


आज देशभरात बालिका दिन साजरा करण्यात येत आहे. स्त्री सशक्तीकरणासाठी आणि स्त्री – पुरुष समानता यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे सातत्याने प्रयत्नशील असतात. महिलांच्या प्रश्‍नावर पक्ष गंभीर असतो याआधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण प्राप्त झालं. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खा. शरद पवार यांचा प्रचंड प्रभाव असून स्त्री-पुरुष समानता हा कोणत्याही देशाच्या शक्तीचा गाभा आहे. मुलीचे सशक्तीकरण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकू, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!