Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीड‘हमभी इस देश के है, हमारी गिनती करो’ पंकजा मुंडेंचे मोदी सरकारला...

‘हमभी इस देश के है, हमारी गिनती करो’ पंकजा मुंडेंचे मोदी सरकारला रिमाइंडर


बीड (रिपोर्ट)- भाजप नेत्या, माजी मंत्री आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी इतर मागासवर्गीय समाजाची जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणीवजा आठवण केंद्र सरकारला करून दिली आहे. ही आठवण करून देताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा सन २०११ मधील संसदेतील भाषणाची एक क्लिप ट्विट केली आहे. या भाषणात मुंडे ओबीसींची जनगणना करण्याची मागणी करत आहेत. ’आम्ही देखील या देशातील आहोत, आमची गणना करा… ओबीसी जनगणनेची आवश्यकता आणि अपरिहार्यता… काही आठवणी काही वचने’, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणासह केले आहे.
पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या संसदेतील सन २०११ मधील एक भाषण ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. या भाषणाद्वारे गोपीनाथ मुंडे हे केंद्र सरकारकडे स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी करत आहेत. त्यावेळी आयटी प्रवेशासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आले होते. तसेच न्यायालयात ओबीसींची आकडेवारी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने त्यावेळी दिले होते. मात्र, आमच्याकडे ओबीसींची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे सरकारने कोर्टाला सांगितल्याचे गोपीनाथ मुंडे आपल्या भाषणात सांगत आहेत. देशात एकूण ५४ टक्के ओबीसी समाज असल्याचेही मुंडे यांनी भाषणात म्हटले आहे.’
आजही समाजाची मानसिकता जातीवाचक असून समाजातून जात पूर्णपणे नष्ट झालेली नाही. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी मुंडे करताना दिसत आहेत. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या याच भाषणाचा आधार घेत केंद्र सरकारला ओबीसी जनगणनेची आठवण करून दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!