Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडजि.प.च्या खर्चाचा, प्रशासकीय कामकाजाचा उपायुक्त भांगेंनी घेतला आढावा

जि.प.च्या खर्चाचा, प्रशासकीय कामकाजाचा उपायुक्त भांगेंनी घेतला आढावा


बीड (रिपोर्टर)- हे आर्थिक वर्ष पुर्णपणे कोरोनामध्ये गेलेले आहे. मार्च-एन्ड संपायला केवळ दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ८० कोटी रुपयांचा खर्च मार्च एन्डपर्यंत करावयाचा आहे. त्यासोबतच या खर्चाचे नियोजन, झालेला खर्च, आयपास यंत्रणेतील जिल्हा परिषदेची कामगिरी या बाबत आज सकाळपासून औरंगाबाद विभागाचे महसूल उपायुक्त भांगे हे आढावा घेत आहेत.
या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, पंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्त गिरी, सामान्य प्रशासन विभागाचे डॉ. काळे व मुख्य तथा लेखा वित्त अधिकारी जटाळे यांचा यात समावेश आहे. या चारही विभागातील व्तिार अधिकारी, कक्ष अधिकार्‍यांसह विविध यंत्रणेचे अधिकारी आपआपला आढावा घेऊन या बैठकीत सहभागी होणार आहेत. ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी भांगे यांनी समजून घेत कामकचुराई करणार्‍या कर्मचार्‍यांनाही खडसावण्याचे काम भांगे यांच्याकहून होत आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेकडून ८० कोटी रुपये मार्च एन्डपर्यंत खर्च करण्याची ताकीदही विविध विभागातील यंत्रणांना दिली आहे. त्यासोबतच पुर्ण क्षमतेने आयपास यंत्रणेत जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणेने आपले मंजुरीचे आणि खर्चाचे प्रस्ताव दाखल करावेत, जेणेकरून उर्वरित २५ टक्के राहिलेला निधी जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून मिळवता येईल, असेही भांगे यांनी या वेळी सांगितले.

Most Popular

error: Content is protected !!