Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीडमध्ये काकु-नाना हॉस्पीटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिटमध्ये अँजिओग्राफी कॅम्पचे आयोजन

बीडमध्ये काकु-नाना हॉस्पीटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिटमध्ये अँजिओग्राफी कॅम्पचे आयोजन


बीड (रिपोर्टर): बीड शहरातील अल्पावधीत नामांकित झालेल्या काकु-नाना मेमोरिअल हॉस्पीटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिटच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अल्पदरामध्ये अँजिओग्राफी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कॅम्पमध्ये मराठवाड्यातील हृदयरोग विकार असणार्‍या रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पीटलच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२१ या एक महिन्याच्या कालावधीत अँजिओग्राफी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे या अँजिओग्राफीसाठी ३००० रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे. आपल्या हृदयात जर ब्लॉकेज असतील आणि अँजिओप्लास्टी व पेसमेकर(पीपीआय)ची जर आवश्यकता असेल तर अँजि-ओग्राफीसाठी घेतलेले ३००० रुपये परत म्हणजे अँजिओग्राफी अगदी मोफत करण्यात येणार आहे. संबंधीत रुग्णांनी या कॅम्पमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान नोंदणीसाठी ९५५१६०१२१२, ९०२२२२०६५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!