Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडपदस्थापनेसाठी शिक्षक बसले उपोषणाला गायरान जमीनीसाठी आमरण उपोषण

पदस्थापनेसाठी शिक्षक बसले उपोषणाला गायरान जमीनीसाठी आमरण उपोषण


बीड (रिपोर्टर)- ऑनलाईन अंतरजिल्हा बदलीने आलेल्या २४ शिक्षकांना अद्यापही पदस्थापना दिली नसल्याने पदस्थापनेसाठी हे शिक्षक जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे तर गायरान जमीनीच्या सातबार्‍याची नक्कल नावे करण्यात यावी या मागणीसाठी महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील माजी सैनिक आपल्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. एकुणच प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयांसमोर आंदोलन सुरू असल्याने या आंदोलनाने दोन्ही कार्यालयांचा परिसर दणाणून गेला आहे.
ऑनलाईन अंतरजिल्हा बदलीने बीडमध्ये २४ शिक्षक आलेले आहेत. या शिक्षकांना अद्यापही पदस्थापना देण्यात आलेली नाही. वारंवार विनंत्या करूनही शिक्षण विभाग पदस्थापना देत नसल्याने आजपासून हे शिक्षक जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. यामध्ये उमेश सांगळे, कांबळे, खंडागळे, शिंदे, कदम, खांडे, मुंडे, जोशी, नागरगोजे, घोलप, औसरमल, अश्‍विनी शिंदे, काळे, वाघमारे, शिवाजी सांगळे, बालाजी सूर्यवाड, ससाने, झेंडे यांच्यासह आदी शिक्षकांचा सहभाग आहे.
धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील सदाशिव व्यंकटराव मंत्री हे आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. बीड-म्हाळसजवळा, परळी-माटेगाव, लऊळ-पात्रूड या रस्त्यावरील बोगस भूसंपादन प्रस्ताव व डांबरी रस्ता खोदून नव्वद अंशाच्या कोनात वळणे देऊन बनवलेला धोकादायक रस्ता सरळ करण्यात यावा, अशी मागणी मंत्री यांची आहे तर शिरूर तालुक्यातील पाडळी येथील दलित वस्तीमध्ये सार्वजनिक जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अवैध बांधकाम करण्यात आले आहे, ते हटवण्यासाठी जानू सवरदे, प्रदीप सरवदे, नितीन सरवदे, विशाल सरवदे, सूर्यकांत सरवदे हे उपोषण करत आहेत. गेवराई तालुक्यातील रामपुरी येथील शालिनी मुरलीधर शरणागत या महिलेचेही उपोषण सुरू असून सरकारी गायरान जमिनीच्या सातबाराची नक्कल देण्यात यावी, अशी मागणी सदरील महिलेची आहे. गेवराई येथील इनामी जमीनीच्या संदर्भातही काही नागरिकांचे आंदोलन सुरू आहे. एकूणच या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!